ठेविले अनंते तैसेचि रहावे.. चित्ती असू द्यावे समाधान ।
आजच्या जगात तुकाराम महाराजांच्या वरील ओळीप्रमाणे वागले तर जगणे अवघड होऊन जाईल.
परवा मित्र भेटला म्हणाला खूप छान चालू आहे जसे इंजिनीरिंग पूर्ण केले जॉब मिळाला पगार चांगला होता म्हणून लगेच फ्लॅट घेतला , 90% लोन मिळाले एकदम लॅव्हिश फ्लॅट.. 20 वर्षाचे हफ्ते आहेत टेन्शन नाही. गेल्या दिवाळीत गाडी घेतली 8 वर्ष फक्त हफ्ते आहेत . मी त्याच्याकडे बघत राहिलो .. कशावर खुश होत आहे हा माणूस ? अख्ख आयुष्य हफ्ते भरण्यात जाणार आहे तरीही कसा खुश राहू शकतो .. मी माझेच calculation करू लागलो ..
फ्लॅटसाठी घेतलेले लोन होते 50 लाख .. हफ्ता होता 48,000 प्रति महिना , 20 वर्ष अंदाजे तो भरणार होता 1,15,20,000 ( एक करोड पंधरा लाख आणि वीस हजार ) गाडीचे लोन होते 12 लाख , 9% व्याजाने , 8 वर्ष हफ्ता .. तिथे तो भरणार होता 16,87,703 ( सोळा लाख सत्यांशी हजार आणि सातशे तीन रुपये )
या संपूर्ण काळात गाडी पण त्याची नाही आणि घर पण त्याचे नाही .. ते आहे फक्त बँकेचे ..
आपल्यापैकी बरेच जण अशाच स्वप्नात असतात. जिथे कि गाडीचा 17,000 आणि घरासाठीचा 48,0000 हफ्ता प्रत्येक महिन्याला, केवळ 5 वर्ष स्विंग ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्ट करून कंपाऊंडिंग केले तरी त्याचे 4 करोड होतील. निम्मे जरी झाले तरी 2 करोड होतील .. कुठलेही लोन काढण्याची गरजच नाही उलट टेन्शन फ्री येईल. पण आपल्या पिढीला इंग्रजांकडून जो वारसा मिळाला आहे तो म्हणजे शिक्षण झाले कि नोकरी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळ्या गोष्टी हफ्त्यावर घेणे. कधी आपण यातून निघणार काय माहित ?
म्हणूनच वाटते ” ठेविले अनंते तैसेचि रहावे.. चित्ती असू द्यावे समाधान ।” असे मानून पारंपरिक ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा थोडा वेगळा विचार करून शेअर मार्केट मध्ये प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
Leave a Reply